दि. ७ मे २०२३
छत्रपती युवराज श्री संभाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत अकलूज मध्ये ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. पहिले दोनही दिवस अकलूजकरांनी या स्पर्धेसाठी अतुलनीय प्रतिसाद दिला असल्याने अंतिम बाजी कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी महिला प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचा अंतिम सामना हा दिल्ली विरुद्ध उत्तर प्रदेश असा होणार होता. दिल्लीची शिक्षा तर उत्तर प्रदेशची दिव्या. अखेर स्पर्धा सुरु झाली आणि अवघ्या २ मिनिटामध्ये दिव्याने दिल्लीच्या शिक्षास पराभूत केले आणि चांदीच्या गदे वर आपले नाव कोरले. त्याचबरोबर ५ व्या सब ज्युनियर मुलींच्या ‘राज्य अजिंक्यपद कुस्ती’ स्पर्धेत ४६ किलो वजनगटात (१७ वर्षाखालील) ‘ताराराणी महिला कुस्ती केंद्रा’ची ‘शिवानी कर्चे’ हीने तर ४० किलो वजनगटात (१५ वर्षाखालील) ‘वेदिका शेंडे’ने सुवर्णपदक पटकावले.
या कार्यक्रमासाठी छत्रपती युवराज श्री.संभाजीराजे भोसले, माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते-पाटील साहेब, आदरणीय सौ.नंदिनीदेवी मोहिते-पाटील, मा.श्री.मालोजीराजे भोसले, श्री. रणजितसिंह मोहिते-पाटील साहेब, आ.राम सातपुते, मा.श्री.जयसिंह मोहिते-पाटील साहेब, मा.श्री.मदनसिंह मोहिते-पाटील साहेब, हिंद केसरी श्री.अमोल बुचडे, कुस्तीगीर परीषदेचे नामदेवराव मोहीते व श्री.अर्जुनसिंह मोहिते-पाटील साहेब, सौ.शितलदेवी मोहिते-पाटील, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, श्री.शिवतेजसिंह मोहिते-पाटील साहेब, कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या वेळी महाराष्ट्र केसरी पै. रावसाहेब मगर यांनी मानाचा फेटा देऊन आदरणीय श्री. धैर्यशील मोहिते-पाटील साहेब व सौ.शितलदेवी मोहिते-पाटील यांचा सत्कार केला.