अकलूज मध्ये पुन्हा घुमणार घुंगरांचा आवाज. राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचं आयोजन – २०२४

Published on | By Akluj City

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान. महाराष्ट्रातील विविध कलाप्रकारांमध्ये लावणीला विशेष महत्व आहे. पूर्वापार पासून चालत आलेल्या या लोककलेनं मराठी रसिकांवर आपले अधिराज्य गाजवले आहे. पूर्वीच्या काळी संस्थानिके तसेच राजदरबारात लावणीला आश्रय मिळायचा.

नंतर काळ बदलत गेला नि लावणी कला अडगळीत पडते कि काय असं वाटू लागलं. परंतु लावणीला मागे पडू न देता तिला विशेष स्थान आणि पुढे नेण्यासाठी काही मोजक्याच दर्दी आणि रसिक कलाप्रेमींनी लावणीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला.

त्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल अकलूजच्या आदरणीय सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचा व त्यांचा सुपुत्रांचा. पूर्वीच्या काळी लावणी तथा तमाशा कलेला काही लोक तुच्छतेने पाहायचे. त्यावेळी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी या सर्व गोष्टी बाजूला ठेवून लावणीकलेला आश्रय दिला. त्यांच्या पश्चात त्यांच्या सुपुत्रांनी अकलूजमध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या स्मरणार्थ गेली २५ वर्षे कोणताही खंड पडू न देता राज्यस्तरीय लावणी महोत्सव भरविला. मधील काही वर्षे बंद झालेला हा लावणी महोत्सव जानेवारी २०२४ मध्ये पुन्हा एकदा दिमाखात सुरु होणार आहे.

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर आयोजित, श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील (आक्कासाहेब) यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त व मा.श्री. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व मा.श्री. मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे अमृतमहोत्सवी वाटचाली निमित्त अकलूजमध्ये राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचं आयोजन केलं आहे.

राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे:

💠 दि. ९, १० व ११ फेब्रुवारी २०२४

💠 स्थळ : सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील स्मृतीभवन, शंकरनगर-अकलूज

💠 वेळ : दररोज दुपारी ४ वाजता

💠 प्रवेशिकांसाठी संपर्क मोबाईल : 9764113695