ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेचे अकलूज मध्ये उदघाटन, आदरणीय विजयसिंह मोहिते-पाटील साहेब, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उपस्थित

Published on | By Akluj City

दि. ५ मे २०२३

हलगी संबळाच्या गजरात आणि हजारोंनी जमलेल्या अकलूजकरांच्या उपस्थितीत ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेचे उदघाटन झाले. स्पर्धेचे उद्घाटन आदरणीय विजयसिंह मोहिते-पाटील साहेब व मा. सौ. नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभ हस्ते झाले. या वेळी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी देखील कार्यक्रमास हजेरी लावली हाती.

तीन दिवस ( दि. ५, ६ ७ मे ) या कुस्ती स्पर्धा विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल अकलूज या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रात होणार आहेत. महाराष्ट्र तसेच परराज्यातून सुमारे ७०० पेक्षा जास्त महिला कुस्ती पटूंनी या स्पर्धे साठी हजेरी लावली आहे. या स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व खेळाडूंची व्यवस्था समिती तर्फे केली जाणार आहे. यामध्ये त्यांचा प्रवास खर्च, त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मोफत असेल अशी माहिती मा. सौ. शितलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील, अध्यक्षा ताराराणी महिला केसरी कुस्ती कुस्ती केंद्र शंकरनगर अकलूज यांनी दिली. तसेच सर्व खेळाडूंना एक दिवस सयाजीराजे वॉटर पार्क मोफत असणार आहे अशी माहिती मा. श्री. जयसिंह मोहिते-पाटील साहेब उर्फ बाळदादा, संचालक सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना अकलूज यांनी दिली.

ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकाला १ लाख रूपये रोख आणि चांदीची गदा बक्षीस देण्यात येणार आहे. महिला केसरी स्पर्धा जिंकणाऱ्यास सरकारी नोकरी मिळावी यासाठी आपण महाराष्ट्र सरकार कडे पाठपुरावा करणार आहोत अशी माहिती मा. सौ. शितलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील यांनी कार्यक्रमावेळी दिली. हि स्पर्धा कोण जिंकेल हे पाहणे येणारी वेळच सांगणार आहे.

या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे खास आपल्यासाठी.

Tararani Mahila Kesari Kusti Spardha Akluj Solapur

Tararani Mahila Kesari Kusti Spardha Akluj Solapur

Tararani Mahila Kesari Kusti Spardha Akluj Solapur

Tararani Mahila Kesari Kusti Spardha Akluj Solapur

Tararani Mahila Kesari Kusti Spardha Akluj Solapur