दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १0 नोव्हेंबर धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरूवात होत आहे. लक्ष्मी पूजन १२ नोव्हेंबर, दिवाळी पाडवा १४ नोव्हेंबर तर भाऊबीज १५ नोव्हेंबरला आहे. पावसाने ह्या वर्षी जरी कमी प्रमाणात हजेरी लावली असली तरी वर्षातून एकदा येणारा हा महत्वाचा सण प्रत्येक जण साजरा करतो. इतर सणांच्या तुलनेत दिवाळी हा सण प्रत्येकासाठी खास असतो. कारण दिवाळी म्हंटलं कि समोर येतो तो दिवाळीचा फराळ, नवीन कपडे, फटाके, मिठाई आणि बराच काही. दिवाळीचा फराळ करण्यापासून ते खरेदी करण्यापर्यंत महिला खूप उत्सुक असतात.
आपल्यापैकी बरेच जण ऑनलाईन खरेदी पेक्षा बाजारात जाऊन खरेदी करणे पसंत करतात. ऑनलाईन मिळणारे सामान कोणत्या दर्जाचे असेल याची आपल्याला खात्री नसते त्याच सोबत पैसे वाचवण्याकडे आपला कल असतो. २-४ ठिकाणी फिरून ज्या ठिकाणी आपल्या पैश्याची बचत होईल अशा ठिकाणी आपण दिवाळी बाजार तसेच इतर वस्तूंची खरेदी करतो.
चला तर मग मी तुम्हाला अशाच काही दुकानांची नावे सांगणार आहे जी अकलूज पासून जवळ तर आहेत पण सोबत पैश्यांची बचत देखील करणार आहेत.
१. AR Mart
पत्ता: अकलूज-वेळापूर रोड, खंडाळी ता. माळशिरस जि. सोलापूर
वेळ: सोमवार – रविवार सकाळी ९ ते संध्याकाळी ९
संपर्क क्रमांक: ९३२२६४९४६१
या ठिकाणी दिवाळी साठी अनेक आकर्षक ऑफर्स, खरेदीवरती भेटवस्तू देखील आहेत. AR Mart मध्ये किराणा आणि कपडे एकाच ठिकाणी मिळत आहेत.
२. D Mart
पत्ता: जुनी पेठ, पंढरपूर ता. माळशिरस जि. सोलापूर
वेळ: सोमवार – रविवार सकाळी १० ते संध्याकाळी १०
संपर्क क्रमांक: ०२१८६ २९९ १२१
D Mart माहित नाही असे खूप कमी लोक असतील. D Mart मध्ये किराणा, सौंदर्य उत्पादने, कपडे, घरगुती उपकरणे आणि बरेच काही आहे. प्रत्येक वस्तुवरती असणाऱ्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये वस्तू उपलब्ध आहेत.
तुम्हाला अजून अशी काही ठिकाणे माहिती असल्यास नक्की कळवा आम्ही ती इथे प्रसिद्ध करू.
माहिती आवडल्यास पुढे फॉरवर्ड करा.