५ मे पासून अकलूज मध्ये होणार महिलांच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धा

Published on | By Akluj City

दि. ५ मे पासून अकलूज मध्ये ताराराणी महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. हि कुस्ती स्पर्धा मॅट या प्रकारात असून ३ दिवस ( दि. ५, ६ व ७ मे २०२३ ) असणार आहे. या स्पर्धेचे आयोजन ताराराणी महिला कुस्ती केंद्र व शिवरत्न कुस्ती केंद्र शंकरनगर, अकलूज यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या स्पर्धेसंबंधीची अधिक माहिती खालील प्रमाणे:

आयोजक: ताराराणी महिला कुस्ती केंद्र व शिवरत्न कुस्ती केंद्र शंकरनगर, अकलूज

स्थळ: विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल, अकलूज

नाव नोंदणीची अंतिम तारीख: २८ एप्रिल २०२३

वजन घेण्याची तारीख: ५ मे २०२३ रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजे पर्यंत

नाव नोंदणी साठी संपर्क क्रमांक: 9850104104 | 9822525018 | 9604136946 | 9890313443 | 8087541009

Maharashtra Kesari Mahila Kusti Spardha Akluj

नियमावली

  • कुस्ती स्पर्धा भारतीय कुस्ती महासंघाच्या नियमानुसार घेण्यात येतील.
  • कुस्ती स्पर्धा फक्त मॅटवर होईल. स्पर्धेसाठी कॉश्च्यूम (Costume) व शूज सक्तीचे राहील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक राहील.
  • भारतीय कुस्ती महासंघाच्या सूचनेनुसार 15 वर्षे वयोगट – 1 जानेवारी 2008 व 18 वर्षे वयोगट -1 जानेवारी 2005 नंतरचा जन्म असलेले पात्र कुस्तीगिर सहभागी होतील.
  • 15 वर्षे व 18 वर्षे कुस्तीगिरांसाठी शाळेचा दाखला, बोनाफाईड, शाळेचे ओळखपत्र, जन्मदाखला (यापैकी एक) असणे बंधनकारक आहे. कुस्तीगिरांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्याचे तंदुरूस्ती प्रमाणपत्र व पालकाचे संमतीपत्र असणे आवश्यक आहे.
  • नांव नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहे. यासाठी आपल्या मोबाईलमध्ये 1. पासपोर्ट साईज फोटो (ओळखपत्रासाठी), 2. आधारकार्ड, 3. बोनाफाईड सर्टिफिकेट, शाळेचे ओळखपत्र, जन्मदाखला (यापैकी एक) असणे आवश्यक आहे. नावनोंदणी करतेवेळी ते अपलोड करावेत.
  • ऑनलाईन नांव नोंदणी करतेवेळी कुस्तीगिराने जी कागदपत्रे अपलोड केली आहेत त्याची मूळ प्रत वजन घेतेवेळी सोबत आणावी.
  • नांव नोंदणीच्या वेळी कुस्तीगिराने जे वजन नोंदविलेले आहे त्या वजनगटासाठी वजन घेतेवेळी न बसल्यास अथवा जादा झाल्यास ज्या वजनगटासाठी वजन बसेल त्याच वजनगटात कुस्तीगिरास खेळवले जाईल याची कुस्तीगिर, प्रशिक्षक व आखाडा प्रमुखांनी नोंद घ्यावी.
  • ऑनलाईन पद्धतीने नांव नोंदणीची लिंक अंतिम तारखेनंतर बंद करण्यात येईल. अंतिम तारखेनंतर आलेल्या कुस्तीगिरांना सहभागी होता येणार नाही याची कुस्तीगिर, प्रशिक्षक व आखाडा प्रमुखांनी नोंद घ्यावी.
  • भारतीय कुस्ती महासंघाने डोपींग कारवाई केलेल्या खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
  • महाराष्ट्रातील खेळाडूंना एस.टी. महामंडळ तिकिटाप्रमाणे पूर्ण प्रवास भत्ता देण्यात येईल.
  • खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.
  • स्पर्धेमध्ये काही तांत्रिक बदल करावयाचा झाल्यास त्याचे अधिकार आयोजन समितीकडे राहतील.